Blog Detail

Image

श्रीमंत...

2023-07-04

Web Design

 D. M. Parshuramkar

Manohar Parrikar CM of Goa स्वादुपिंडाच्या कॅन्सर ने 2018 साली admitted in USA त्याचे हे शब्द ... Political क्षेत्रात मी उत्तुुंग यशाची शिखरं गाठली.... इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले.... तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी political status माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थितीमात्र बनून राहीली. आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय. आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्यु जवळ श्वासोच्छवासही मला जाणवतोय… आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक महत्वाचं आपण करायला हवं असतं: त्यात कदाचित् नातीगोती जपणं किंवा समाजसेवा करणे. सातत्यानं केवळ politics मागे धावण्यामुळे माणूस आतून फक्त आणि फक्त पिळवटतच जातो... अगदी माझ्यासारखा... आयुष्यभर मी जी संपत्ती and political मानमरातब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही... जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे?..."आजारपणाचा बिछाना" …(defence cha nahin) आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्यानं मिळतो, आपल्यासाठी पैसे कमावून देणारे ministers ठेवता येतात... पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही-कधीही नेमू शकत नाही... हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही...आणि ती असते आपलं आयुष्य काळ समय . शस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय ही जाणिव असते...ते पुस्तक असतं "निरोगी जगण्याचं पुस्तक". सध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून-वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो. स्वत:कडे दुर्लक्ष करू नका... स्वत:च स्वत:चा आदर ठेवा. इतरांनाही प्रेमानं वागवा... लोक माणसं वापरायला शिकतात, आणि पैसे जपायला शिकतात वास्तविक पैसा वापरायला हवा, आणि माणसं जपायला हवीत... आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या रडण्याने होते, आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो, मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा, आणि त्यासाठी सदैव आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा...!!! MANOHAR GOPALKRISHNA PARRIKAR

    Post Views:  335